logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   टॉप स्टोरी

खासदारांनी केली पुतळ्यांची साफसफाई

पंतप्रधानांच्या अभियानाला प्रतिसाद, फुले अन आंबेडकरांच्या पुतळ्यांचे भाग्य उजळले!

लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत खा. सुनील गायकवाड यांनी आज अभिनव उपक्रम राबवला. महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची साफसफाई केली. यासोबतच खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचा परिसरही स्वच्छ केला. मनपाचे कर्मचारी दररोज या पुतळ्यांची निगा राखतात पण हे पुतळे रस्त्याच्या कडेला असल्याने त्यावर दिवसभर धूळ जमा होते. ती आम्ही साफ केली असे खासदारांनी सांगितले. अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची खासदाराने साफसफाई केल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. यावेळी नगरसेवक हन्मंत जाकते, गोरोबा गाडेकर, प्रवीण अंबुलगे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top