HOME   टॉप स्टोरी

दहावीत कोकण सर्वात पुढे, नागपूरचा निकाल सर्वात कमी

यंदाही मारली मुलींनीच बाजी, लातूरचा निकाल ८६.३० टक्के


लातूर: यंदाच्या दहावीच्या परिक्षेत मुलींनी अव्वलस्थानीअसून राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक निकाल प्राप्त केला. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाच्या नशिबी आला आहे. महाराष्ट्राचा निकाल ८९.४१ टक्के लागला असून विभागनिहाय निकाल या प्रमाणे; पुणे ९२.०८, नागपूर ८५.९७, औरंगाबाद ८८.८१, मुंबई ९०.४१, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, नाशिक ८७.४२, लातूर ८६.३०, तर कोकण विभाग ९६.०० टक्के.
लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के लागला असून नांदेड जिल्हा ८३.०३, उस्मानाबाद ८५.६६ तर लातूर जिल्ह्याने ९०.२० टक्के कमावले आहेत. लातूर जिल्ह्यात १८ गैरप्रकार आढळले, उस्मानाबादेत २९ तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५२ विद्यार्थ्यांनी गैरप्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. लातूर विभागात रिपीटर्सचा निकाल ४०.३४ टक्के इतका लागला आहे. दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचे सचिव शशिकांत हिंगोणेकर यांनी ही माहिती दिली.


Comments

Top