logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   टॉप स्टोरी

घड्याळ घातलेल्या ‘हातांनी’ मला विजयी केले- सुरेश धस

कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, विश्वासघात केला- अशोक जगदाळे

घड्याळ घातलेल्या ‘हातांनी’ मला विजयी केले- सुरेश धस

लातूर: लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस विजयी झाले. हा विजय पंकजा मुंडे यांचा असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात केली आहे असा राजकीय निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मते फुटली हे स्पष्ट झाले असून घड्याळ घातलेल्या ‘हातांनी’ मला विजयी केले अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे तर कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी दिली आहे. या निवडणुकीत १००४ मतदान झाले. त्यापैकी धस यांना ५२६ तर जगदाळे यांना ४५२ मते मिळाली. एक मत नोटाला गेले. २५ मतपत्रिकांवर सांकेतिक आकडे लिहिल्याने ती मते बाद ठरवण्यात आली. ७४ मतांनी धस विजयी झाले.
सकाळी ०८ वाजता उस्मानाबाद तहसिल कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. सगळ्या मतपत्रिका एकत्र करण्यात आल्या. २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले. मोजणी सुरु असताना दोन्ही उमेदवार सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यात बाचाबाची झाले. त्यामुळे मतमोजणी काही काळ रखडली. जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने ते पुन्हा सुरु झाली. पुढे तासाभरातच निकाल हाती आला. जगदाळे यांनी फेर मतमोजणीचीही मागणी केली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर लातूर भाजपाचे नेते रमेश कराड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऐनवेळी जादूची काय ‘कांडी फिरली’ हे कळाले नाही. कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना समर्थन दिले. त्याचा उपयोग झाला नाही. त्यांची शंभरावर मते धस यांच्या पारड्यात पडली. त्यातली २५ बाद ठरली आणि धस यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.


Comments

Top