HOME   टॉप स्टोरी

शैलेश गोजमगुंडे स्थायी समितीचे सभापती!

दीपक सूळ यांनी फेकला माईक, निवड अवैध असल्याचा दावा, न्यायालयात जाणार


लातूर: लातूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरी संख्याबळातील काही अडचणींमुळे कॉंग्रेसच्या अशोक गोविंदपुरकरांना स्थायी समितीच्या सभापतीपतीपदाची संधी मिळाली जोती. या संधीला वर्ष पूर्ण झालं आणि आज सभापतीपदाची निवड झाली. भाजपच्या शैलेश गोजमगुंडेंना अविरोध सभापती म्हणून संधी मिळाली. कॉंग्रेसने उमेदवारीच दाखल केली नाही. सभेच्या सुरुवातीपासून ही निवड प्रक्रिया अवैध असल्याचा सूर अनेक सदस्यांनी लावून धरला होता. त्यात प्रकाश पाठक आघाडीवर होते. या निवडीची सूचनाच निघाली नव्हती. भाजपाने केवळ आपल्या सोयीसाठी हा खेळ घडवून आणला असा आरोप सदस्य करीत होती. ताण एवढा वाढत गेला की काही सदस्यांनी खुर्च्या तोडल्या. विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी तर डायसच्या दिशेने माईकच फेकून मारला. विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, सचिन मस्के, सपना किसवे आक्रमक झाले होते. भाजपच्या काही नगरसेवकांनीही असाच पवित्रा स्विकारला होता.
पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यामुळे आपणास ही संधी मिळाली. लातुरकरांच्या गरजा आणि अपेक्षानुसार आपण करु, शहराच्या विकासाला गती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे वचन शैलेश गोजमगुंडे यांनी आजलातूरशी बोलताना दिले.


Comments

Top