HOME   टॉप स्टोरी

‘एक दिवस एक अधिकारी’ भेटा डीडीआर जाधवांना

सहकारात घट पण दर्जेदार, चांगल्या संस्था नक्कीच टिकतील, गुणात्मक वाढ हवी


लातूर: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सहकार क्षेत्र भरभराटीला आले. तितकेच बदनामही झाले. अनेक संस्था बंदही पडल्या. आज लातूर जिल्ह्याचे उप निबंधक म्हणून समृत जाधव यांनी जबाबदारी घेतली आहे. जाधवांना हा जिल्हा नवा नाही, त्यांनी बाजार समितीचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. लातुरातल्या बदलीनंतर मोठा प्रवास करुन ते पुन्हा लातुरात आले ते जिल्हा उपनिबंधक म्हणून. त्यांच्या काळात अनेक सहकारी संस्था आस्तित्वात होत्या त्यापैकी बर्‍याचशा आज दिसत नाहीत. मधल्या काळात धोरणे बदलली. कारखाने चालवायला देणे, अवसायनात निघणे अशा अनेक बाबी घडल्या. ज्या संस्थांचे कारभार चांगले आहेत त्यांना कसलीच अडचण नाही. सहकारी संस्थांची संख्यात्मक वाढ होण्यापेक्षा गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. भविष्यात अशाच संस्था टिकतील अशाच संस्थाच टिकतील असे समृत जाधव म्हणाले.


Comments

Top