HOME   टॉप स्टोरी

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला मनपा शाळेचा सहावीचा वर्ग दत्तक

सहावीत असताना मारला होता शिक्षकाला दगड, मनपा शाळेला १० लाखांचा निधी


लातूर: लतुरच्या प्रभाग पाच मधील महानगरपालिकेचा नऊ क्रमांकाच्या शाळेला चांगले दिवस येऊ घातले आहेत. या शाळेचा दहावीचा निकाल ९५ टक्के लागला. उत्तम इमारत, विस्तीर्ण मैदान, गुणी शिक्षक आणि शिक्षणाचा वाढता दर्जा पाहून जिल्हाधिकार्‍यांचीही नजर शाळेकडे वळाली आहे. काल त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने हारतुरे, भेटवस्तू न आणता वह्या आणाव्यात असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार हजारो वह्या जमल्या. त्यांनी त्या वह्यांचं या शाळेत सहकुटुंब उपस्थित राहून वाटप केलं. जिल्हाधिकार्‍यांनी या वह्यांच्या दुसर्‍या पानावर प्रोत्साहनपर संदेशही लिहिला आहे. त्याचं वाचन करुन दाखवलं. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणी सांगितल्या. सहावीत असताना आपण एका शिक्षकाला दगड फेकून मारला होता. त्याची आठवण म्हणून आपण या शाळेतला सहावीचा वर्ग दत्तक घेत आहोत अशी घोषणा केली. कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सहावीच्या वर्गाची पाहणी केली. यात काय काय सुधारणा करता येतील याची चर्चा केली. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी यांच्या प्रयत्नांतून ही शाळा आकार घेत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकही विक्रांत गोजमगुंडे यांनीच केले. याच कार्यक्रमात स्वच्छता नामक बालिकेच्या आरोग्याचे पालकत्व डॉ. दत्ता गोजमगुंडे यांनी घेतले. त्याची पत्रिकाही बनवून दिली.


Comments

Top