HOME   टॉप स्टोरी

मातंग समाजाचा लातुरात बंद

भारत बंदचा इशारा, महाराष्ट्रात अन्यायाची मालिका सुरु असल्याची तक्रार


लातूर: राज्यभर मातंग समाजावर या ना त्या कारणाने अत्याचार केले जात असून वाकडीचे प्रकरण किळसवाणे आणि माणुसकीलाही लाजविणारे आहे असे सांगत आज मातंग समाजाने राज्याच्या बंदची हाक दिली होती. त्यानुसार लातुरात शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळपासून बाजार बंद करायला सुरुवात केली. बंदच्या आवाहनाला विवेकानंद चौकातून आरंभ झाला. आंबेडकर चौकातून साठे चौकात आल्यानंतर अण्णाभाऊंना वंदन करण्यात आले. पुढे गंजगोलाई, गांधी चौक, अशोक हॉटेल, शिवाजी चौक या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्ते पोचले. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सुपूर्त केले.
या निवेदनात जळगावचे वाकडी प्रकरण, लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी, नांदेड जिल्ह्यातील बामणी, हमालपुरा, भिमा कोरेगावची पूजा सकटची हत्या, मदनसुरी येथील अशोक शिंदे यांचा खून, पनवेलचे खून प्रकरण आदी प्रकरणांचा तपशील देण्यात आला आहे. राज्यभरात मातंग समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज क्षिरसागर, विकास कांबळे, सुनील सौदागर, शाम चव्हाण, दीपक गोणे, महादू रसाळ, जीए गायकवाड, आनंद वैरागे, मोहन सुरवसे, राहूल क्षिरसागर, दत्ता मस्के, रवी कदम, पंडीत हनमंते, अशोक देडे, अनिल शिंदे, सुनील बसपुरे, संजय कुंटेवाड, गोरख शिंदे, उद्धव शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top