logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   व्हिडिओ न्यूज

अविनाश चव्हाणांचे प्रेत अजून शवागारातच

हळूहळू गर्दी ओसरली, आता अध्यक्ष विजय चौगुले यांची प्रतिक्षा

लातूर: खाजगी शिकवणी संस्थेचे संचालक अविनाश चव्हाण यांचे विच्छेदन केलेले प्रेत रात्री आडेनऊ वाजेपर्यंत शवागारातच होते. आरोपींना पकडा तोवर शव नेणार नाही असा पवित्रा नातलग आणि मित्र परिवाराने घेतल्याने सर्वांचीच गोची झाली. डीवायएसपी हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे, गजानन भातलवंडे, अशोक माळी त्यांचे सहाय्यक, महिला पोलिस, इतर पोलिस कॉन्स्टेबल, राखीव पोलिस ही सगळी मंडळी सकाळपासून याच ठिकाणी आहे. समाजाचे नेते विजय चौगुले मुंबईहून आल्याशिवाय निर्णय घेणार नाही असा निर्धार चव्हाण यांच्या आप्तांनी घेतल्याने आणि चौगुले केव्हा येतील याची खात्री नसल्याने पोलिसांनी शव विच्छेदनगृहाच्या परिसरातच राहुट्या ठोकल्या. दिवसभर हजारोंनी गर्दी केली होती. रात्री नऊच्या आसपास ती ओसरली. आता सकाळी अकरा वाजता अविनाश चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना होईल अशी शक्यता पोलिस अधिकार्‍यांनी वर्तवली.


Comments

Top