HOME   व्हिडिओ न्यूज

मनमोहक तिरंगी जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकार्‍यांच्या कल्पकतेतून साकारलेला प्रयोग सर्वांना भावला


लातूर: आज स्वातंत्र्यदिन या निमित्ताने अनेक ठिकाणी सारखीच रोषणाई केली जाते. पण लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या कल्पकतेतून अनोखी रोषणाई केली. सबंध जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रोषणाईने सजवले. हा प्रयोग सर्व लातुरकरांना भावला. शहरात बाहेरुन येणारे जाणारेही कौतुकाने हा प्रयोग पहात होते. हा प्रयत्न निश्चितच अनोखा आहे अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक सुधीर बादाडे यांनी व्य्क्त केली.


Comments

Top