logo
news image नांदेड मार्गावरील सरकारी गोदामम चोरट्यांनी फोडले, २८ हजारांचा ऐवज गायब news image ०१ मे रोजी लातूर मनपाच्या स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त, भाजपाचे सहा, कॉंग्रेसचे दोन news image लातुरच्या गंजगोलाईतील पहविक्रेत्यांचा अहवाल मागवला आयुक्तांनी news image उदगीर तालुक्यातील १५ जलसाठे कोरडे, ४० गावात टंचाई news image सचिन तेंडुलकरचं ४७ व्या वर्षात पदार्पण, शतकांचा शतकवीर, जगभर नाव news image देशात मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा होऊ शकतो, शरद पवारांचं मत news image १५ राज्यात ६४.६६ टक्के मतदान news image महाराष्ट्रात १४ मतदारसंघात झालं मतदान news image पुण्यात सर्वात कमी मतदान, सर्वाधिक मतदान झाले कोल्हापुरात news image राहूल गांधी म्हणतात अमित शाह हत्येचे आरोपी news image वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना वॉरंट news image अनंतनागमधील ४० मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही news image पंतप्रधान हा कुठल्याही एका धर्माचा असू शकत नाही- शरद पवार news image अभिनेता अक्षयकुमारने घेतली पंतप्रधानांची भेट, मुलाखतही घेतली अराजकीय news image पंतप्रधानांना व्हायचं होतं सैनिक! news image हाफ चड्डीची फुल पॅंट झाली पण अक्कल नाही वाढली- धनंजय मुंडे

HOME   व्हिडिओ न्यूज

पालकमंत्री जिल्ह्याला लागलेले ग्रहण- अभय साळुंके

उजनी धरणातून मंगल कलश आणून करणार अभिषेक

लातूर: संभाजीराव पाटील हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे नसून ते पणवतीमंत्री आहेत असे अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये लातूर शहरास पाणी पुरवठा करणार्‍या मांजरा धरणात फक्त २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे येणार्‍या काळात पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लातूर शहरास उजनी धरणाचे पाणी द्यावे अशी मागणी अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मात्र त्या मागणीचा पाठ्पुरावा न करता पालकमंत्री गरज नसल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री हे जिल्ह्यास लागलेले ग्रहण असल्याचे साळुंके म्हणाले. आजपासून धनेगाव बॅरेजमधुन एमआयडीसीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे १० हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. यामुळे काही दिवसात उजनी धरणातून मंगलकलश आणून ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि निळकंठेश्वराला अभिषेक करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले ते पत्रपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्र्यानी संभाजीरावांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कुलदीप सुर्यवंशी, शंकर रांजणकर, विष्णू साबदे, दिनेश बोरा, सुरज झुंजे पाटील, विशाल माने उपस्थित होते.


Comments

Top