logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

रामेगावात दुसरी राष्ट्रीय धम्म परिषद

लातुरात रॅली, राज्यभरातून उपासकांची उपस्थिती

लातूर: रामेगाव येथे आज बौद्ध धम्म परिषद आयोजीत करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे उदघाटन भिक्खू सदानंद महाथेरो यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पुर्वी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ध्वजारोहण करुन सर्व उपासक बौद्ध मुर्ती घेउन शरातील गंजगोलाई ते आंबेडकर पार्क दरम्यान धम्म रॅली काढण्यात आली. समाजात बुद्धांचे विचार रुजले पाहिजेत त्यांच्या मार्गावर सगळ्या बौद्ध उपासकांनी या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन भिक्खू पय्यानंद यांनी केले आहे. मागील ३ वर्षांपासून लातूरमध्ये धम्म परिषदेचे आयोजन केले जाते आहे. यावर्षी लातूर तालुक्यातील रामेगाव येथे ९ एकर जागेवर ही धम्मपरिषद संपन्न होते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना या धर्मात आणले. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर चालून आयुष्य सुखकर बनवता येते असे केशव कांबळे यांनी यानिमित्ताने सांगितले. या धम्मपरिषदेसाठी राज्यातून लोक आले आहेत. या परिषदेसाठी माजी मंत्री देवेंद्र थेरो ही आले आहेत.


Comments

Top