logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   व्हिडिओ न्यूज

महापौरांना ठरवा अपात्र, कॉंग्रेसची मागणी

मान्यतेपेक्षा अधिक बांधकाम, कर बुडवला, नियमांची केली पायमल्ली

लातूर: महापौरांनी अनधिकृत बांधकाम करीत कराची चोरी केली आहे. मनपा आर्थिक अडचणीत असताना महापौरच अशी फसवणूक करतात. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, याबाबत कॉंग्रेस न्यायालयातही जाणार आहे अशी माहिती आज झालेल्या अत्रकार परिषदेत ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी दिली.
महापौर सुरेश पवार यांनी हनमंतवाडीतील घरी बांधकाम परवान्यापेक्षा अधिक बांधकाम केले, त्यांनी कराची चोरी केली, ३३.६५ चौरस मिटर बांधकामाची परवानगी घेतली. पण त्यापेक्षा अधिक बांधकाम केले, ते अजूनही चालू आहे. मनपा अडचणीत असताना कर बुडविला. कामगारांसाठी लागू केलेला करही बुडवला. हा सत्तेचा माज आहे. पदाचा गैरवापर आहे. याचा कायदेशीर पंचनामा केला आहे. पक्षाने त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, सुरेश पवार यांचं नगरसेवकपदही रद्द झाले पाहिजे. हा प्रश्न विधानसभा आणि विधानपरिषदेतही आ. अमित देशमुख, विखे पाटील आणि धनंजय मुंडे मांडणार आहेत. भाजप स्वच्छ कारभार करते असा दावा केला जातो. कर बुडवणार्‍या महापौरावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तातडीने पदमुक्त करायला हवे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा सगळा दस्तावेज विधिवत तयार करुन महापौरांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी कॉंग्रेसने सुरु केली आहे.


Comments

Top