logo

HOME   व्हिडिओ न्यूज

मराठा क्रांती मोर्चाने मानले सरकारचे आभार

लातुरच्या शिवाजी चौकात केला जल्लोष

लातूर: विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मराठा समाजाचा १६ टक्के आरक्षणाचा ठराव मंजूर केला. तो पुढे राज्यपालांकडे जाईल अध्यादेश निघेल, कदाचित त्याला वेळही लागेल. पण फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळला. आज दोन्ही सभागृहांनी आरक्षण मंजूर केल्याने राज्यभर आनंद साजरा झाला. लातुरातही शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाने जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी आरक्षणाबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी गणेश गोमचाळे, ऋषी कदम, कुणाल वागज, राहूल मोहिते पाटील, अविराजे निंबाळकर, दिनेश जावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top