HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरात बॅंक कर्मचार्‍य़ांचा संप कोट्यवधींची उलाढाल ठप्प

बीएसएनएल आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यांनीही दिला पाठिंबा


लातूर: सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात देशातील १० केंद्रीय कामगार संघटना आजच्या आणि उद्याच्या राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. हा संप म्हणजे सरकारच्या आर्थिक धोरणांचा आणि कामगार कायद्यात होऊ घातलेल्या घातक बदलांच्या निषेध करण्यासाठी बंद पाळण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. सरकारच्या AIBEA संघटनेच्या वतीने लातूर शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेच्या समोर सरकारच्या निदर्शने करण्यात आली. ७२ टेलीफोन कर्मचार्‍यांनी या संपास पाठिंबा दिला आणि ९७ पोस्ट कर्मचार्‍यांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. या संपामधून १० कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. बॅंक कर्मचार्‍यांच्या संपामुळे ०१ हजार कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. सरकारच्या अर्थिक आणि कामगार विषयक धोरणांवर बोलताना बॅंकिंग उद्योगाचे खासगीकरण करण्याचे धोरण रेटत आहे. तसेच बॅंकेचे कर्ज बुडवणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. नवीन कर्मचार्‍यांची नौकर भरती करावी. या मागण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशांत धामणगावकर, दीपक माने, उत्तम होळीकर, प्रकाश जोशी, अदित्य देशपांडे, प्रणाई मेश्राम, राधिका मुंदडा, गजानन औटी यासह शेकडो बॅंक कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top