• 20 of March 2018, at 7.37 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

मनपा अभियंता मुंडेंच्या केबिनला कुलूप

कॉंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातली कामे होत नाहीत, नगरसेवक सचिन मस्केंचा आरोप

लातूर: लातूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता असल्याने कॉंग्रेस नगरवकांच्या प्रभागातली कामे केली जात नाहीत असा आरोप करीत प्रभाग नऊचे नगरसेवक सचिन मस्के यांनी मनपा अभियंत्याच्या केबिनला कुलूप घातलं. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रामकिशन मुंडे पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरुन कामांकडे दूर्लक्ष करतात असे मस्के म्हणाले. आठ दिवसात प्रभागातली कामे न झाल्यास आयुक्तांच्या केबिनला टाळे ठोकू असा इशारा मस्के यांनी दिला आहे.
प्रभाग सातमधील विंधन विहिरीची कामे बाकी आहेत. यावरुन गेलेली पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. अनेक ठिकाणच्या तोठ्या तुटल्या आहेत. गळती होत आहे. अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे आहेत. यातलं बरंचसं काम नव्याने करावे लागणार आहे. मागच्या वर्षी आपण भीषण दुष्काळाला तोंड दिले. तो अनुभव पाहता ही कामे व्हायला हवी. पक्षीय भेद करुन ही कामे पाच सहा महिन्यांपासून टाळली जात आहेत कामे होणारच नसतील तर वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा मस्के यांनी दिला आहे. मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रभागात पाहणी केली असता मिनी वॉटर सप्लाय योजनेचे तीन तेरा वाजलेले दिसले. अनेक ठिकाणी पाईप तुटलेले असून पाण्याची गळती असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणच्या तोट्या गायब असून अनेक टाक्या कोरड्या दिसून आल्या.


Comments

Top