HOME   व्हिडिओ न्यूज

शेतकर्‍यांना पैसे मिळेनात, आडत्यांनी केला बाजार बंद

खरेदीदार पैसे देईनात, त्यांच्यावर बाजार समिती प्रशासकीय कारवाई सुरु


लातूर: आधीच दुष्काळ, त्यात खरीपही गेले आणि रबीही करता आली नाही. या बिकट परिस्थितीत असलेला शेतीमाल आडत्याकडे सोपवला जातो. खरेदीदार तो खरेदी करतो. या मालाचे पैसे संध्याकाळपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर पडावेत असा नियम असतानाही अनेक खरेदीदारांनी मिळून कोट्यवधी रुपये थकवले आहेत. यामुळे शेतकरी, आडते आणि बाजार समिती अशी सारीच यंत्रणा अडचणीत आली आहे. पैसे चुकवणार्‍या खरेदीदारांवर कारवाई केली जात आहे. कालच त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती सभापती ललितभाई शहा यांनी दिली. दरम्यान सगळ्या आडत्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दोनेक दिवसात प्रकरण मार्गी लागेल असे बोलले जात आहे.


Comments

Top