HOME   व्हिडिओ न्यूज

१६ फेब्रुवारीला ओबीसींचा मोर्चा, आरक्षणाच्या संरक्षणासाठी

मराठा आरक्षणामुळे अन्याय होण्याचे संकेत, गायकवाड आयोग रद्द करा


लातूर: ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी १६ फेब्रुवारीला ओबीसींचा मोर्चा काढण्य़ात येणार आहे अशी माहिती ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे यांनी सांगितले. या विषयावर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होण्याची शक्यता वाटते. मराठा समाजाला दुहेरी फायदा मिळेल अशी शंका होती. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर मागास आयोगाचा अहवाल जाहीर करण्यात आला. यात शासनाच्या चुका दिसून येत आहेत. ज्या संस्थांना सर्वेक्षणाचं काम दिलं होतं. त्यांचे अहवाल अजून सार्वजनिक करण्यात आले नाहीत. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सांगितले. त्यामुळे कुणबी समाजाचे आरक्षण आणि सरकारने देऊ केलेले १६ टक्के आरक्षण यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका पोचू शकतो.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, न्या. गायकवाड आयोग बरखास्त करावा, ओबीसी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीतील कपात रद्द करावी, ती वाढवावी ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नेमून भरघोस करावा, मंडल आयोगाची १०० टक्के अमलबजावणी करावी आदी विविध मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बुरबुरे म्हणाले.


Comments

Top