logo
news image आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी news image लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान news image महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान news image मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी news image आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते news image जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड news image उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान news image साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार news image श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका news image चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी news image अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक news image विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी

HOME   व्हिडिओ न्यूज

बार्शी मार्गावर ट्रक-ट्रॅक्टरचा अपघात एक ठार

कांद्याने भरलेला ट्रक, मृत माने अपचुंद्याचे

लातूर: लातूर-बार्शी मार्गावर मांजरा कारखान्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत विश्वनाथ माने (वय ५७ अपचुंदा ता. औसा ) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ट्रक चालक माने कांद्याने भरलेला ट्रक घेऊन लातूरकडे निघाले होते. त्यांचा ट्रक मांजरा साखर कारखाना परिसरात आला असता समोरून येणाऱ्या वेगवान ट्रॅक्टरची (एम.एच.१३ ए.जे. ३९३६) समोरा-समोर धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरची ट्राली पालथी झाली असून ट्रकची एक बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालक माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Comments

Top