• 18 of December 2017, at 4.35 am
  • Contact
  • booked.net
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

कायद्याचे पालन हीच देशसेवा- नितीन बानगुडे पाटील

शिवबांची महती सांगत महत्वाचे प्रसंग केले हुबेहूब उभा

नितीन भाले, लातूर: कायद्याचे पालन हीच देशसेवा आहे, घालून दिलेले नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे असं सांगत प्रा. नितीन बान्गुडे पाटील यांनी लातुरचा गड सर केला. टाऊन हॉलच्या मैदानावर झालेल्या या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. शिवरायांची महती सांगत त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग पाटील यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून उभे केले. आजचा काळ आणि शिवबांची निती यातली विषमता त्यांनी अधोरेखित केली. आपल्या ओघवत्या अर्थपूर्ण, दिशादर्शक भाषणातून त्यांनी समर्थपणे जगण्याचा मंत्रही दिला. नरवीर तानाजी मालुसरे युवा संघटनेच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते.

Comments

Top