logo

HOME   व्हिडिओ न्यूज

औशात येणार नरेंद्र मोदी!

युतीचे बडे शिलेदारही राहणार उपस्थित, भाजपाने लावले सारे अवसान

लातूर: लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय वातावरण गरम झाले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी औसा येथे सभा घेणार आहेत.
आज लातूर येथील कस्तुराई मंगल कार्यालयामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेवून ०८ एप्रील रोजी महायुतीची सभा होणार आहे. या सभेला संबोधीत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे औसा येथे येणार आहेत. यासह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्तिथी राहणार आहेत यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा. रामदास आठवले यासह अन्य नेत्यांची उपस्थिती असणार आहे. लातूर आणि उस्मानाबाद या मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


Comments

Top