logo

HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना

प्रशासनाकडून जागा बदलण्याचे आदेश, पण सर्रास ऊल्लंघन

लातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ या भागात दोन चुरमुर्‍याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. भरवस्तीमध्ये विटभट्टी, चुरमुरा कारखाना, लाकडी कारखाना या प्रकारचे कारखाने असू नयेत असे कायद्यात नमुद आहे. या नियमांना धाब्यावर बसवून ही भट्टी चालत आहे. प्रदुषणाचे नियम पाळले जात नाहीत आणि स्वछतेची काळजी घेतली जात नाही. रस्त्यावर शेंगादाणे वाळवले जात आहेत. यामुळे तेथील स्थानिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही भट्टी वसाहतीमधून हलवण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रभागाचे नगरसेवक कैलास कांबळे यांनी केली आहे अन्यथा अंदोलनाचा ईशारा देण्यात आला.


Comments

Top