HOME   व्हिडिओ न्यूज

नाफ़ेडवर २३ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी

मूग आणि उडीदाच्या विक्रीसाठी आज ऑनलाईन नोंदणी बंद


लातूर (आलानेप्र): सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांवर २३ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रांवरील अटी शर्यतींमुळे अनेक शेतकरी खुल्या बाजाराकडे वळत आहेत. शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची मग त्यांना एसएमएसद्वारे माहिती पाठ्विली जाते. त्यानंतर आपला शेतमाल घेवून केंद्रावर जायचे आहे. सोयाबीन सोबतच मूग, उडीदही खरेदी केले जात आहे. यामध्ये सोयाबीन ३०५० या भावाने, मूग ५५७५ तर उडीद ५४०० रुपये या हमीभावाने खरेदी केली जात आहे. शेतीमाल विकल्यानंतर ०८ दिवसात धनादेशाद्वारे पैसे दिले जात आहेत. आजवर जिल्ह्यात सोयाबीनसाठी ११७२९ शेतकर्‍यांनी नोंद केली आहे. त्यातून २३ हजार ८०० क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली आहे. मुगासाठी २२६६ शेतकर्‍यांनी आपली नावे नोंदविली आहेत. त्यातून १४८४.५० क्विंटल खरेदी झाली आहे. उडिदासाठी ४७२८ शेतकर्‍यांनी नावे नोदविली होती त्यातून ८७३२ क्विंटलची खरेदी झाली आहे. मूग आणि उडीदासाठीचा कालचा शेवटचा दिवस होता तर सोयाबीनची खरेदी १५ जानेवारीपर्यंत चालू आहे.


Comments

Top