HOME   व्हिडिओ न्यूज

हल्ला पूर्व नियोजित कट, रॅलीला मोठा प्रतिसाद, हल्ले खपवून घेणार नाही!

लातुरात जनजीवन विस्कळीत, वाहने मिळेनात, आरोग्य सेवेचे हाल, तोडीस तोड उत्तर देण्याचा जवाब


लातूर: भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला डाव्या विचारांच्या संघटना तसेच संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा होता. त्यामुळे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूर शहरात व जिल्ह्यात कडकडीत बंद शांततापूर्ण पद्धतीने पाळण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद विद्यापीठ संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उमटल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. लातूर शहरात सर्वच व्यापार्‍यांनी बंद पाळला असून, सकाळी काही दुकाने उघडलीच नाहीत. ज्यांनी दुकाने उघडली त्यांना विनंती केल्यानंतर ती ही बंद करण्यात आली. लातूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली. आंबेडकर चौक येतून मोटार सायकल रॅली निघून गरुड चौक, शाहू चौक, गोलाई, आंडेकर पार्क मैदानामध्ये एकत्र जमून लातूर शहरातील सर्व दुकाने, शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. ही मोटार सायकल रॅली व लातूर बंद शांततापुर्ण मार्गाने पार पडला. सरतेशेवटी आंबेडकर पार्कमध्ये सगळे भिमसैनिक जमले व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करुन याची सांगता झाली. या अंदोलनास संभाजी ब्रिगेड, डावी आघाडी आणि एमआयएम या संघटनांनी पाठिंबा दिला होता..


Comments

Top