HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरच्या सार्वजनिक भिंती हागणदारीमुक्त कधी होणार?

सार्वजनिक भिंतींचे विद्रुपीकरण, जाहिरातींचा मारा, नियंत्रण नाही


लातूर: लातूर शहरातील सार्वजनिक भिंतींचे प्रचंड विद्रुपीकरण केलं जातंय. सरकारी इमरातींच्या भिंती, पुलाच्या भिंती जाहिरातींनी विद्रुप झाल्या आहेत. यावर कुणाचंही नियंत्रण नाही. लातूर शहर हागणदारीमुक्त होतंय पण या भिंतीवरल्या हागणदारी केव्हा हटणार असा प्रश्न आहे. स्वच्छतेच्या संदेशांवरही सिनेमाची पोस्टर्स बिनधास्त लावली जातात. त्यांना गांधीजींचे चित्रही कळत नाही. उड्डाण पुलाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दिवसा आणि रात्रीही या पुलावर ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा रास्ता रोको असतो तर भिंतींवर जाहिरातींची खिचडी दिसते. ज्याने जाहिरात लावलीय त्यालाही आपली जाहिरात सापडत नसेल अशी अवस्था आहे. अशा सार्वजनिक जागा मनपाने ताब्यात घेऊन परवानगी आणि शुल्काशिवाय जाहिराती लावता येणार नाहीत असा दंडक घालून द्यायला हवा. एवढे सगळे विद्रुपीकरण सुरु असताना लोकही बोलत नाहीत त्यामुळे त्याची दखलही कुणी घेत नाही!


Comments

Top