HOME   व्हिडिओ न्यूज

नामविस्ताराची चळवळ नव्या पिढीला कळाली पाहिजे

रिपाइंच्या कार्यक्रमात आवाहन, महापौर, उप महापौरांचीही उपस्थिती


लातूर: शहरातील आंबेडकर चौकात विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नामवंतांची भाषणे, आणि धम्म्ज्योती शिंदे यांच्या
भीम गितांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना रिपाइंचे प्रदेश सचिव चंद्रकांत चिकटे यांनी दलित चळवळीचा आढावा घेतला, भिमा कोरेगाव आणि निलंगा येथे दलितांवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला. आपल्या भाषणात चिकटे यांनी नामविस्तार चळवळीचा इतिहास सांगितला. कार्यकर्ते, महिलांवर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. ही चळवळ आजच्या युवकांना कळाली पाहिजे असं ते म्हणाले. आंबेडकर चौकात झालेल्या या कार्यक्रमाला आंबेडकर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, चंद्रकांत चिकटे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी गंगाधर सरवदे, डॉ. गुळवे, नितीन मोरे, मोतीराम दैठणेकर, अमर चिकटे, प्रकाश मोरे, आकाश ससाणे, विशाल गायकवाड, नितीन कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top