logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   व्हिडिओ न्यूज

लातूरचे पथदिवे बंद, कॉंग्रेसनं काढला मेणबत्ती मोर्चा

हेंडगे अन कंदिलही सहभागी, महापौरांच्या डोक्यात प्रकाश पडू द्या, सुळांची प्रार्थना

लातूर: लातूर शहरातील बहुतांश भागातील पथदिवे बंद आहेत. वीज बील थकल्याने महावितरणने कनेक्शन कापले आहे. मधल्या काळात यावर मार्ग काढत असल्याचा, मार्ग निघाल्याची चर्चा झाली पण हेही दिवे फार काळ टिकले नाहीत. याचा निषेध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गांधी चौकातून मेणबत्ती मोर्चा काढला. काहीजण कंदील तर काहीजण टेंभेही घेऊन सहभागी झाले होते. अंधार्‍या रस्त्यावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते मेणबत्त्यांच्या प्रकाशात खुलून दिसत होते. `दीपक' सूळ यांनी तर डोक्यावरच कंदील घेतला होता. हा मोर्चा येतोय हे कळूनही मनपाने मुख्य प्रवेशद्वार उघडेच ठेवले होते. बाकी इतर मोर्चांच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार लावून घेण्याची परंपरा आहे. या मोर्चेकर्‍यांनी मनपाच्या पायर्‍यांवर बसून घोषणा दिल्या. आणलेल्या मेणबत्त्या रांगेत लावून ठेवल्या. या मेणबत्त्यांपैकी एखादीचा तरी प्रकाश महापौरांच्या डोक्यात पडावा अशी प्रार्थना दीपक सूळ यांनी केली. यावेळी मोईज शेख, व्यंकटेश पुरी, पुनीत पाटील, पप्पु देशमुख, सचिन मस्के, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, रत्नदीप अजनीकर, तबरेज तांबोळी, सुमित खंडागळे, उषाताई कांबळे, दत्ता मस्के, कुणाल वागज उपस्थित होते.


Comments

Top