• 20 of March 2018, at 1.11 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

राजे पुन्हा जन्माला या....शिवाजी चौकात ऐतिहासिक गर्दी

पाणी, पोलिस अन रुग्णवाहिकेसह सगळी चोख व्यवस्था!

लातूर: छत्रपती शिवरायांच्या जयंतीत यंदा अलोट आणि भऊतपूर्व उत्साह दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातून वेगवेगळ्या रॅलीज निघाल्या. या सगळ्यांचं लक्ष्य होतं शिवाजी चौक. भगवे झेंडे हाती घेऊन हे शिवभक्त शिवाजी चौकाकडे धाव घेत होते. दुपारी एकच्या सुमाराला अख्खा शिवाजी चौक गजबजला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. सगळे शिवरायाला वंदन करण्यासाठी आतुरले होते. यामुळे शिवाजी चौक भरत होता, ओसरत होता आणि पुन्हा भरत होता. पोलिसांच्या व्हॅनलाही पुढे जायला अर्धा तास लागला. सबंध चौकात सगळीकडे चोख बंदोबस्त होता. चौकात वेगवेगळ्या भागात अनेक संघटनांच्या वतीने स्टॉल्स उभारण्यात आले होते. पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय एक अंब्युलन्सही सर्व व्यवसथेसह चौकात कायमची उभी होती.


Comments

Top