logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

महिला तंत्रनिकेतन हटवू नका, व्हीएस पॅंथरचे धरणे

गरीब विद्यार्थीनीना हक्काचं शिक्षण, जातीयवादी सरकारला धडा शिकवू

लातूर: लातुरच्या महिला तंत्रनिकेतनला चांगली प्रतिमा आहे, प्रतिसाद आहे आणि परंपराही आहे पण हे तंत्रनिकेतन बंद करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या तंत्रनिकेतनमधून गरीब आणि ग्रामीण मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळते ती हिरावण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वीही अनेकदा असाच प्रयत्न झाला होता, त्याला न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते. आताही असेच प्रयत्न सुरु असून त्याला व्हीएस पॅंथरच्या विद्यार्थी आघाडीने आक्षेप घेतला आहे. हे महाविद्यालय बंद करु नये या मागणीसाठी पॅंथरच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीचे समांतर आरक्षण तसेच ठेवावे, मागासवर्गीयांनाही ओपनमधून अर्ज भरायची मुभा दिली पाहिजे, मागासवर्गियांचा हा हक्क हिरावण्याचा प्रयत्न जातीयवादी सरकारकडून होत आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, एससी, एनटी, ओबीसी विद्यार्थ्यांना पुढे जाऊ न देण्याचा घाट या सरकारने घातला आहे. तो मागे न घेतल्यास व्हीएस पॅंथर्सतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पायाळ यांनी दिला. यावेळी सचिन मस्के, विकास कांबळे, असद शेख, मनोज गायकवाड, हरी केंद्रे, अतुल होळकर, अ‍ॅड. प्रतिक कांबळे, सोनू कांबळे, आनंद जाधव, नितीन कांबळे, पंकज पाचपिंडे, श्रीहरी केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top