• 20 of March 2018, at 1.13 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

चांदणी निस्तेज, दर्शनासाठी रांगा

हिंदीचा एकही शब्द येत नसताना बॉलिवूडवर गाजवलं राज्य

चांदणी निस्तेज, दर्शनासाठी रांगा

मुंबई: हिंदीचा एक शब्दही येत नसताना बॉलिवूडवर राज्य गाजवण्याचा करिश्मा साधणार्‍या श्रीदेवीचे पार्थिव काल रात्री मुंबईत दाखल झाले. त्यांच्या ग्रीन एकर्स या निवासस्थानी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे. ग्रीन एकर्सवर पोचण्याआधी अभिनेता सलमान खान, अर्जुन कपूर, राजपाल यादवसह चित्रपटसृष्टीतील नामवंत हजर झाले होते.
श्रीदेवीचया अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी दीडच्या सुमारास अंत्ययात्रा निघेल. साडेतीन ते चारच्या सुमारास अंत्यसंकार केले जातील. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजासुद्धा श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.
श्रीदेवीची हत्याच!
श्रीदेवी बाथरुममध्ये गेल्या तेव्हा बेशुद्ध पडल्या. त्यामुळे त्या टबमध्ये बुडाल्या. त्यातच त्यांचा अंत झाला हा पोलिसांचा अहवाल सरकारी वकिलांनी मान्य केला. दरम्यान श्रीदेवी यांची हत्या झालीया प्रकरणातले संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज दाखवा, ते का दडवले जाते असा प्रश्न भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. श्रीदेवी ज्या खोलीत उतरल्या होत्या त्या खोलीत कोण कोण होते याचीही माहिती मिळाली पाहिजे असे स्वामी यांचे म्हणने आहे.


Comments

Top