HOME   व्हिडिओ न्यूज

या कचरा टाकायला, अगदी रस्त्यावर, खुल्या ठिकाणी!

कुणी विचारणार नाही, रागावणार नाही, स्वच्छ सर्वेक्षणाबरोबर मनेही झाली स्वच्छ!


लातूर: सर्वेक्षणाआधी घंटागाडीचा उपक्रम सुरु झाला. या दोन उपक्रमांमुळे लातूर बरेचसे स्वच्छ दिसू लागले. एवढ्या कडेकोटपणे शहर स्वच्छ होत असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी एक सुंदर कचरा केंद्र अजूनही सुरु आहे. हवेशीर, रस्त्याला आणि भर शहरात. तुमच्या कचरा टाकण्याला कुणी अडवणार नाही की रागावणार नाहे. सब के लिए खुला है मंदीर हमारा! अधून मधून गाडी येते, कचरा नेते, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! खोरी गल्लीत श्री एजन्सीच्या पुढे मलंग संकुलाच्या समोर हा यज्ञ अव्याहत सुरु आहे. कचरा टाकायची इच्छा झाल्यास जरुर हे ठिकाण निवडायला हरकत नाही. याबाबत इथल्या नागरिकांशी चर्चा केली असता, कचरा गाडी न्यायला येत नाल्याने नाईलाजाने कचरा असा टाकावा लागतो असे सांगण्यात आले.


Comments

Top