logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

शिवाजी चौकात आग, मजुरांनी लावली, सगळीकडे धूरच धूर

डासांना पळवण्यासाठी केला खटाटोप, लातुरकर हैराण, अनेकांनी केली धावत पळत चौकशी

लातूर: लातुरात कचरा व्यवस्थापन काण्यासाठी नवी एजन्सी आल्यापासून कचरा पेटऊन देण्याचे प्रकार वाढले आहेत. कोण बघा घंटागाडीची वाट? येईल तेव्हा येईल. तोपर्यंत स्वाहा! आज संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला शिवाजीनगर ठाण्याच्या बाजुला कामाच्या प्रतिक्षेत उभे राहणार्‍या मजुरांनी नवीच शक्कल लढवली. यातले काही मजूर रात्रीही याच मैदानावर मुक्कामाला असतात. त्यांनी मैदानावर ताडमाड वाढलेलं गवत आणि इतर वन्स्पती काढून दोन कोपर्‍यात जमवल्या, माणसांपेक्षा उंच झालेले हे ढीग दिले पेटवून. आग भडकली आणि नंतर प्रचंड धूर सुरु झाला. हा धूर शिवाजी चौक आणि इतर परिसरात वेगाने पसरला. अनेकजण चक्रावले. अनेकांनी ठाण्यात चौकशी केली. अनेकांनी आगीपर्यंत धाव घेतली.....तेव्हा या मजुरांनी सांगितले, रातच्याला चिल्टं लई ताप देत्यात सायेब, मनुनशान पेटवून दिलो. आम्ही म्हणालो हे डास आज जातील पण उद्या? त्यावर तो मजूर आत्मविश्वासानं म्हणाला, बगता यील की उद्याच्या उद्याला!


Comments

Top