HOME   व्हिडिओ न्यूज

लातुरच्या प्रभाग पाचचं अनुकरण राज्यानं करावं- आ. अमित देशमुख

आमदारांनी पाहिला संपूर्ण प्रकल्प, विक्रांत गोजमगुंडे यांच्या कल्पकतेचे कौतुक


लातूर: स्वच्छ भारत मिशन खर्‍या अर्थानं मनावर घेणारी मंडळी मोजकीच आहे. लातुरचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे त्यातलं अव्वल नाव विक्रांत गोजमगुंडे त्यांनी आपल्या प्रभागातील कचरा जवळपास शून्यापर्यंत आणला आहे. शिवाय या कचर्‍यापासून खत तयार करण्याचा मेगा प्रकल्पही उभा केला आहे. याची दखल घेत आ. अमित देशमुख यांनी या प्रलल्पाला भेट दिली, संपूर्ण माहिती घेतली. प्रभाग पाच तर झिरो गार्बेजकडे जातच आहे, बाकी लातुरकरांनी यातून बोध घेतल्यास शहरही झिरो गार्बेज होईल. याचं अनुकरण राज्याने केल्यास मोठी प्रगती होईल असे आ. अमित देशमुख म्हणाले. प्रभाग पाचमध्ये टाकाऊ प्लास्टीकचा वापर रस्ता तयार करण्यासाठीही करण्यात आला आहे त्याचाही आढावा अमित देशमुख यांनी घेतला
यावेळी बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, माजी आमदार वैजनाथ शिंदे, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख, समद पटेल, गोविंद बोराडे, नगरसेवक गौरव काथवटे, नगरसेविका पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, आयुब मनियार, रघुनाथ मदने, सुभाष पंचाक्षरी, तबरेजज तांबोळी, नरेंद्र अग्रवाल. शैलेश बोविंदवाड, अजिंक्य सोनवणे आणि प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


Comments

Top