logo
news image विविध मागण्यांसाठी २५ हजार प्राध्यापकांचे आजपासून कामबंद आंदोलन, तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार news image पेट्रोल १४ तर डिझेल १० पैशांनी वाढले news image साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीत जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी म्हणणारे उदयनराजे आणि डीजेही गायब news image चंद्रात साईबाबांची प्रतिकृती दिसत असल्याची मुंबईत चर्चा news image राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे खासदार झालो हे शरद पवारांचे विधान असत्य, माझे राजकारण आणि त्यांचा संबंध नाही - प्रकाश आंबेडकर news image सरकारने चार वर्षांत राबविलेल्या २०० लोकोपयोगी योजनांच्या आधारावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपची तयारी news image नाणार प्रकल्पातील पुनर्वसितांच्या भूसंपादनासाठी द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती news image वर्धा येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला जागा देण्यास सेवाग्राम आश्रममाने दाखविली असमर्थता news image व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलवर थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यास राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता news image राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ०९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५५ तालुक्यांत कुष्ठरोग शोध अभियान news image गणपती विसर्जनादरम्यान चारकोप आणि पवईत गणेशमूर्ती अंगावर पडून १९ जण जखमी news image कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाचा पहिला बोगदा खोदण्याचे काम पूर्ण news image मुंबईकर संसर्गजन्य तसेच डेंग्यूच्या तापाने हैराण news image कुपोषणमुक्तीमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही?- मुंबई उच्च न्यायालय news image मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे

HOME   व्हिडिओ न्यूज

आयुक्तांचा झटका जोर से लागे! शेत खाणार्‍या कुंपणावर कारवाई!

मनपाच्या जागेवर घर बांधणार्‍या कर्मचारी जीवन कडने यांचे घर पाडण्याची कारवाई सुरु

लातूर: लातूर शहरातील ठाकरे चौक परिसरातील मनपा शाळा क्रमांक ०४ च्या जागेवर जीवन कडने यांनी ०४ हजार स्वेअर फूट जागेवर अतिक्रमण करून दोन मजली घर बांधले होते. हे घर मागील २५ वर्षांपासून असल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण २०११ सालपासून न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठानेही अरक्षित जागेवरील अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्तांनी सुनावनी घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने असे आदेशीत केले होते की सदरील जागा ३० दिवसांच्या आत रिकामी करावी. लातूर मनपाचे नव्याने रुजू झालेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा आदेश कायम ठेवत आज सकाळी कारवाई केली. यात या घराच्या दोन खोल्या पाडण्यात आल्या. उर्वरीत जागेचा ताबा महापालिकेने घेतला आहे. घरास सील करण्यात आले आहे. यावेळी महापालिका सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सहदेव बोराडे, पंडीत पवार, सुरेश कांबळे, शंकर अडगळे, मुस्तफा शेख, नागनाथ कांबळे, तुकाराम गव्हाणे, काशिनाथ पाखरे आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते. कडने हे मनपाचे कर्मचारी आहेत. स्वच्छता कामात कसूर केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्य़ात आले होते. त्यांना पुन्हा कामावर घेतल्याचे वृत्त आहे.


Comments

Top