HOME   व्हिडिओ न्यूज

भाजपाच्या उपोषण नाटकाला धीरज देशमुखांचे उत्तर

सरकारला आत्मक्लेशाची नव्हे तर आत्मपरीक्षणाची गरज!


लातूर: भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व पातळयांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षाकडे बोट दाखवत आत्मक्लेश उपोषणाचे नाटक संपुर्ण देशभर केले गेले. खरे तर या सरकारांना आत्मक्लेशाची नव्हे तर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे मत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ लातूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने युवा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतू पोलीस प्रशासनाने मूक मोर्चास परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या निर्णयाचा आदर राखत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथेच मूक बैठक घेण्यात आली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्याफिती बांधुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्क्रीय कारभाराचा निषेध केला. खा. सुनील गायकवाड यांच्या उपोषणाला धीरज देशमुख आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर दिले
सत्ताधार्‍यांना उपोषण शोभत नाही, उपोषण हा राजकारणाचा मार्ग नाही असे अण्णा हजारे म्हणाले होते. मूक बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना धीरज देशमुख म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला, कामगार यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांना केंद्र सरकार उत्तरदायी असते. परंतू आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतमजूर, युवकांच्या हाताला काम नाही, महिलांवर, दलितांवर, अल्पसंख्याख्यकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत, महागाई वाढत आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. जनतेच्या या सर्व प्रश्नांवर काँग्रेस पक्षाकडून आंदोलने केली जात असताना संसदेत बहुमतात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी सभागृह चालू दिले नाही, असा खोटा अपप्रचार करुन आत्मक्लेश उपोषण करीत आहेत. खरे तर त्यांना आत्मक्लेशाची नव्हे तर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असेही धीरज देशमुख म्हणाले.
या बैठकीस लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडिले, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के, राजेसाहेब सवई, पंचायत समितीचे माजी सदस्य बादल शेख, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, विलास को-ऑप.बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, विजय निटूरे, प्रदीप राठोड, विनोद सुडे, प्रशांत घार, रवींद्र काळे, डॉ. दिनेश नवगिरे, अमित जाधव, विश्वजीत देशमुख, गजानन भोपणीकर, लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, नगरसेवक इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, सिकंदर पटेल, कुणाल वाघज, प्रविण घोटाळे, अॅड.किरण जाधव, जफारनाना, श्रीनिवास शेळके, गणेश भोसले, ओमप्रकाश सोनवणे, प्रमोद कापसे, असलम शेख, एम एच शेख, नीरज गोजमगुंडे, यशपाल कांबळे, महंमदखान, अॅड.दिनेश रायकोडे, आसिफ शेख, सतिष हलवाई, राज क्षीरसागर, जफर सय्यद, सुरज राजे, निखीलेश पाटील, अहेमद सरवर, सरवर शेख, प्रा.अमोल शिंदे, अर्जुन महानुरे, पवन लांडगे, सचिन सुर्यवंशी, सुशिल खोसे, मुरारी पाटील, गोविंद आलुरे, गोविंद ठाकुर, निरज गोजमगुंडे, अजित काळदाते, रामहरी गोरे, तब्रेज तांबोळी, अॅड.खुशालराव सुर्यवंशी, जय ढगे, सुंदर पाटील, मुस्तफा शेख यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top