HOME   व्हिडिओ न्यूज

आता वांदे हरभर्‍याचे, तुरीनंतर शेतकरी पुन्हा संकटात

तुरीचे पैसे न मिळाल्याने हरभरा हमी भाव केंद्राकडे पाठ, बाजारात विकणे भाग


लातूर: मागच्या वर्षी सरकारने हातावर तुरी ठेवल्याने शेतकर्‍यांना व्यापार्‍यांच्या दारात कटोरा पसरावा लागला. व्यापार्‍यांनीही त्यांचा चांगलाच फायदा घेतला. तुरीने असे अनुभव दिल्याने यंदा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर हरभर्‍याचं पीक घेतलं. हरभर्‍याच्या विक्रीतही असाच अनुभव येत आहे.
सरकारने हरभर्‍यासाठी प्रति क्विंटल ४४०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. वाजत गाजत खरेदी केंद्राची सुरुवात झाली. याहीवेळी आधी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. लग्नसराईचे दिवस आल्याने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. ऑनलाईन विक्री केल्यावर पैसे कधी मिळतील याची खात्री नाही त्यामुळे व्यापार्‍यांना शरण जावे लागत आहे. खुल्या बाजारात हरभर्‍याचा भाव तीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान कमी अधिक होत असतो. हे भाव समाधानकारक मिळण्याची शक्यता कमी आहे कारण दररोज दहा ते बारा हजार क्विंटल हरभर्‍याची आवक होत आहे शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही भाव कमीच असल्याने येथे भाव वाढत नाहीत. भावासाठी अडून बसल्यास व्यापारी बाहेरुन येणारा स्वस्तातला हरभरा खरेदी करण्यास पसंती देत आहेत. यातून कसा मार्ग काढायचा हा मोठा प्रश्न आहे. हातावर तुरी दिल्या असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे आता सरकारने शेतकर्‍यांच्या हातावर हरभरे ठेवले असे म्हणावे लागेल!


Comments

Top