logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

असिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ

खटला जलदगती न्यायालयात चालवा, असिफाच्या कुटुंबाला संरक्षण द्या

लातूर: जम्मूतील अल्पवयीन मुलगी असिफावर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरुन भारतीय समाजमन ढवळून निघाले आहे. याबाबतचा संताप लातुरातही व्यक्त करण्यात आला. मुस्लीम सेवा संघाने आज गांधी चौकात धरणे आंदोलन केले. असिफाचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, या प्रकरणात असिफाच्या बाजुने काम करणार्‍या वकिलाला धमकी देणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी याबाबतच्या निवेदनात करण्यात आली आहे. असिफाला फूस लावून मंदिरात नेण्यात आले, तिला अमली पदार्थ देऊन आठ दिवस अनेकदा बलात्कार करण्यात आला. नंतर तिला मारुन टाकण्यात आलं. मुस्लिमात तेढ निर्माण व्हावे, दहशत तयार व्हावी या हेतुने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. असिफाच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाला लोकसत्ता युवा संघटना, मुस्लीम विकास परिषद, श्रीकांत सूर्यवंशी, अभय साळुंके यांनीही पाठिंबा दिला. हिंदुत्ववाद्यांचे हे कृत्य आहे असे लारा शेख म्हणतात, तर पंतप्रधान यावर बोलत नाहीत त्यामुळे निषेध करतो असे फेरोज शेख म्हणाले.


Comments

Top