HOME   व्हिडिओ न्यूज

ध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा, पोलिस मुख्यालयात कार्यक्रम


लातूर: आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन. महाराष्ट्राचा स्थापना दिवस. या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. लातुरच्या स्टेडियमवर काम सुरु असल्याने यंदा हा सोहळा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर घेण्यात आला. पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. कामगारांसह सबंध महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या. पोलिस दलातील विविध विभागाच्या तुकड्यांनी, गृहरक्षक दलाने पालकमंत्र्यांना सलामी दिली, पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली. पोलिस दलातील बॉंबशोधक पथकाच्या श्वानानेही वाकून पालकमंत्र्यांना सलाम केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस प्रमुख डॉ. शिवाजी राठोड, तहसीलदार संजय वारकड, निवासी उप जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.


Comments

Top