HOME   व्हिडिओ न्यूज

Uncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण

लोक दाद देतात पण मंचावरील नेत्यांचे चेहरे ढिम्म! कधी एकदाचं संपतं की!


लातूर: परवा नटवर्य नाना पाटेकर लातुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत सामुहिक विवाह सोहळा पार पडला. ४५ जणांची लग्नं लागली. यावेळी नाना पाटेकरांनी केलेलं भाषण अफलातून होतं. त्यांनी वधूंना समज दिली, त्यांच्या नवर्‍यांना ताकीद दिली, सामाजिक उपक्रमात राबणार्‍या कार्यकर्त्यांना मोलाचे सल्ले दिले. एकूणच नानांचं भाषण सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारं, हसवणारं, अंतर्मुख करायला लावणारं आणि दिशा देणारंही होतं. नाना बोलताना जमलेल्या लोकातून प्रत्येक दोन तीन मिनिटांवर टाळ्या पडत होत्या, हसू फुलत होते पण मंचावरील महान मंडळींच्या चेहर्‍यावरील रेघही हलत नव्हती...... बघा आख्खं भाषण, अनकट!


Comments

Top