HOME   व्हिडिओ न्यूज

पिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले

वेगवेगळ्या वाहनातून परतले, काळजी खूप घेतली पण सगळं प्रकरण चव्हाट्यावर


लातूर: अभ्यास सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक आज अकरा ते एकच्या दरम्यान वेगवेगळ्या वाहनांनी शहरात पोचले. त्यांनी विधानपरिषदेसाठी मतदान केलं.
लातुरला मागच्या अनेक दिवसांपासून पिवळे पाणी येत आहे. काहींच्या मते हे दूषित पाणी आहे तर मनपा पिण्यास योग्य आहे असे सांगते. या पाण्याच्या रंगामागचे कारणच सापडत नाही. नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी धरणाला भेट दिली तेव्हा वेगळीच बाजू समोर आली. पाण्याचा उपसा ज्या जॅकवेलमधून केला जातो तिथपर्यंत धरणाचा पाट आणलेला आहे. या पाटात काहीजण मासेमारी करतात. खेकडे आणि कोळंबी पकडण्यासाठी मच्छीमार पाण्यात विशिष्ट रसायन टाकतात. या रसायनामुळे खेकडे आणि कोळंबी किनार्‍यालगत येतात. मग ते पकडले जातात. असा धक्कादायक प्रकार घडत असल्याने पिवळे पाणी येते हे त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. हे धरणातील पिवळे पाणी तपासले जाईल असे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान ही पिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सत्ताधारी मंडळी सहलीवर गेली. त्यांना लातुरकरांशी काही देणे घेणे नाही. ही मंडळी कसलीही कामे करीत नाहीत असा आरोप गोजमगुंडे यांनी केला आहे.
दरम्यान ‘पिवळ्या पाण्याची’ शिक्षा देऊन सहलीवर गेलेले भाजपाचे नगरसेवक आज सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत लातुरात आले नव्हते. ही मंडळी येडशीजवळ असल्याचे कळाले. दोन बसेस गेल्या होत्या. एका बसमध्ये मिस्टर अन मिसेस नगरसेवक तर दुसर्‍या बसमध्ये नुसते नगरसेवक होते. आज एक वाजण्याच्या सुमारास बार्शीहून वेगवेगळ्या कारमधून ते लातुरात आले. त्यांनी मतदान केलं. सहलीला जाताना त्यांचं चित्रण आजलातुरचे संपादक रवींद्र जगताप करीत होते. त्यावेळी अप्पा मुंडे नावाच्या व्यक्तीनं त्यांना गचांडी पकडून बाहेर काढलं होतं.


Comments

Top