logo
news image राफेल विमान घोटाळा प्रकरणी मोदी सरकार सहीसलामत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या news image राफेल घोटाळ्याची माहिती राहूल गांधींना कुठून मिळते? ते त्यांनी सांगावे- अमित शाह news image जानेवारीत होणार शिक्षकांची मेगाभरती news image मुंबईतला पारा उतरला १८ अंशावर news image मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला दंड रद्द news image अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत रस्ता रुंदीकरणासाठी पाडणार, बच्चन यांचे मौन news image राज्यातील सेतू सुविधा केंद्रातून जात प्रमाणपत्राचं वाटप सुरु news image अतिरेक्यांशी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांचा लष्करप्रमुखांनी केला गौरव news image थकबाकीदार झाला म्हणून माल्या चोर कसा? नितीन गडकरी यांचा सवाल news image रेणा कारखान्यास सर्वोत्तम साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर news image लातुरातील कचरा वाहतूक करणार्‍या दिडशे वाहनांच्या कागदपत्रांची होणार तपासणी news image औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख ठरले अपात्र, प्रभारी नगराध्यक्षपदी जावेद शेख news image लातूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिर्ण इमारती पाडणार news image ग्राहकाला मिळाली सव्वादोन किलो पेंड कमी, लातुरचे व्यापारी लक्ष्मीरमण भुतडा यांना १५ हजारांचा दंड news image चाकूर तालुका मुलींच्या जन्मदरात आघाडीवर news image ०४ वर्षांत राज्यात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या news image कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करणाऱ्या योजना राबवायला हव्यात- एसबीआयचा अहवाल

HOME   व्हिडिओ न्यूज

उरलेली तूर आणि हरभराही खरेदी करणार- पाशा पटेल

१५ लाख बारदाना, दीड लाख टन साठवणुकीची जागा लवकरच उपलब्ध होणार

लातूर: मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही तूर खरेदीचे वांदे झाले आहेत. यंदा त्यात हरभर्‍याची भर पडली आहे. बारदाना नाही, साठवणुकीला जागा नाही. असा नन्नाचा पाढा सुरु आहे. पण सरकारने तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यास संमती दिली आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघेल अशी माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ते पत्रकार परिषदेनंतर आजलातूरशी बोलत होते.
तूर खरेदीची मुदत संपली आहे. हरभरा खरेदीची मुदत संपत आली आहे. असे असताना तूर आणि हरभरा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. तूर खरेदीला अजून मुदतवाढ हवी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. पणन मंत्री सुभाष देशमुख आणि मी केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटलो. दोन तीन दिवसात तूर खरेदीला मुदतवाढ देण्याचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. दोन दिवसात हरभरा खरेदीची मुदत संपणार आहे. पण केवळ बारदाना उपलब्ध नसल्याने ज्या प्रमाणात हरभरा खरेदी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. केंद्राने हरभरा खरेदीलाही मुदतवाढ देण्याबाबत संमती दर्शवली आहे. जागा आणि बारदान्याची अडचण होती. १५ लाख बारदाना सरकार उपलब्ध करुन देत आहे. शिवाय दीड लाख टन हरभरा, तूर साठवण्याची जागाही उपलब्ध झाली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात उर्वरीत तूर आणि हरभराही खरेदी केला जाईल असे पाशा पटेल यांनी सांगितले.


Comments

Top