logo
news image अपूर्वा यादव खून प्रकरणी मुख्य आरोपी अमर शिंदे याला अटक news image लातुरातील अपूर्वा यादव खून प्रकरणी दोन तपास पथके रवाना, चार संशयितांना अटक news image प्रकरण गुंतागुंतीचे, अपूर्वाने एका तरुणाला आत्महत्येस केल्याचा आरोप news image उजनीच्या पाण्यासाठी फेर प्रस्ताव पाठवा, लातूर भेटीत राज्यपालांची सूचना news image मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात news image अटल आरोग्य शिबिरात ३५०० डॉक्टरांची जेवणाची सोय करणार्‍या लातूर व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक news image शिवसेनेचे अभय साळुंके यांनी उजनीचे पाणी आणून सिध्देश्वराला केला अभिषेक news image आजपासून राज ठाकरे दहा दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर news image शबरीमाला मंदिरात महिलांसह सर्वांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश news image महिलांना प्रवेश दिला तर आत्महत्या करु, अनेक भक्तांची धमकी news image संघाच्या नागपूर दसरा पूजेला विरोध नाही, मात्र संघाच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याला विरोध- प्रकाश आंबेडकर news image संघवाल्यांना बेकायदा शस्त्र प्रदर्शन करण्यापासून रोखले नाही तर न्यायालयात दाद मागू- आंबेडकर यांचा इशारा news image महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज- राज्यपाल सी. विद्यासागर राव news image लातुरात राजर्षी शाहू महाविद्यालयातील ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील चर्चासत्राचे राज्यपालांनी केले उद्घाटन news image लातूर येथे विशाल नगर भागात अनंत यादव यांच्या मुलीची हत्या, दोन मोबाईल घेऊन मारेकरी पसार news image ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणात महिलांना संधी दिलेले उद्योग नफ्यात चालतात- राज्यपाल

HOME   व्हिडिओ न्यूज

बॅंक कर्मचार्‍यांचा संप, मोर्चाही काढला, व्यवहार ठप्प

देशभर १० लाख कर्मचार्‍यांचा सहभाग, मोठा नफा मिळूनही केवळ दोन टक्के वेतनवाढ

लातूर: नऊ संघटनांचे सुमारे दहा लाख बॅंक कर्मचारी आज देशव्यापी संपात उतरले. लातुरात या कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला आणि शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआय बॅंकेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. या कर्मचार्‍यांनी बॅंकांना मोठा नफा मिळवून देऊनही केवळ दोन टक्के वेतनवाढ केली याचा निषेध या कर्मचार्‍यांनी केला. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला न देता त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले. आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप, दीपरत्न निलंगेकर, बाळ होळीकर, हनमंत गायकवाड यांनी ही निवेदने स्विकारली. बॅंक कर्मचार्‍यांचे नेते धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
बॅंक कर्मचार्‍यांनी या देशातल्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. पण मोठ्या लोकांचे कर्ज मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. सत्तेत बसलेल्या काही लोकांनी केलेली लूट आहे. पण सामान्य माणसाला वेगवेगळ्या करातून नागवले जात आहे. जाणून बुजून सरकार बॅंक कर्मचार्‍यांवरही अन्याय करीत आहे, सरकारने जणू हे आव्हानच दिले आहे असाही आरोप धनंजय कुलकर्णी यांनी केला. दोन दिवस बॅंका बंद राहणार असल्याने देशभरातील उलाढालींवर विपरीत परिणाम होत आहे.


Comments

Top