HOME   व्हिडिओ न्यूज

भाजपाने केल्या लातुरच्या गैरसोयीच्या प्रभाग समित्या

समित्या निवडीस न्यायालयाची स्थगिती, विरोधक आक्रमक


लातूर: जनतेची कामे सोयिस्कर व्हावीत यासाठी प्रभाग समित्या असणे आवश्यक आहेत, मात्र मनपातील सत्ताधारी भाजपाने लातूरकरांची गैरसोय होईल, अशा पद्धतीने प्रभाग समित्यांची रचना केली अन केवळ भाजपाचेच सभापती व्हावेत, कॉंग्रेसचे होऊ नयेत, असा घाट घातल्याचा आरोप मनपाचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ यांनी केला. प्रभाग समित्यांच्या या बेकायदेशीरपणाबाबत आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी न्यायालयाने प्रभाग समित्या निवडीला स्थगिती दिली. त्यामुळे १४ जून रोजी प्रभाग समित्या व सभापती निवडीची विशेष सभा रद्द करावी लागल्याची माहिती अ‍ॅड. दीपक सूळ यांनी दिली. येथील कॉंग्रेस भवनात आयोजीत पत्र परिषदेत स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, मोईज शेख व नगरसेवक सचिन बंडापल्ले उपस्थित होते. मुळात प्रभाग समित्यांसाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीच्या पहिल्या बैठकीत कॉंग्रेसला दोन व भाजपाला दोन समित्या ठरल्या, मात्र या निर्णयावर असमाधानी असलेया सत्ताधारी भाजपाने पुन्हा बैठक लावली व नव्याने समित्या निवडल्या. त्या बैठकीला मला व सभापती अशोक गोविंद्पूरकर यांना बोलावले नाही. तरीही आम्ही त्या बैठकीत विरोध दर्शविला असे दर्शविण्यात आले. परंतु त्या प्रोसेडिंगवर आमच्या सह्या नाहीत. या समित्यांची निवड कलम २९-अ चे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी आपण औरंगाबाद हायकोर्टात वरिष्ट वकील अ‍ॅड. विनायक होन व अ‍ॅड. पी.पी. मोरे यांच्यामार्फ़त याचिका दाखल केली. न्यायालयात याचिका असताना सताधार्‍यांनी १४ जून रोजी निवडीसाठी विशेष सभा बोलावली. मात्र, सभेच्या एक दिवस आधीच न्यायालयाने या प्रकियेस स्थगिती दिली, असे सूळ यांनी सांगीतले. तर, अशोक गोविंदपूरकर यांनी सताधार्‍यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत आम्ही बैठकीला उपस्थित नसताना त्यांनी उपस्थित असल्याचे दाखविले. मग त्यांनी आमच्या सह्या प्रोसेडिंगला का घेतल्या नाहीत? सह्या असतील तर ते प्रोसेडिंग दाखवावे, असे आव्हान दिले.


Comments

Top