HOME   व्हिडिओ न्यूज

अशी आहे लाईफ लाईन एक्स्प्रेस, मोठा प्रतिसाद, मोफत उपचार

अद्ययावत ऑपरेशन थिएटर, काऊंसलिंग रुम, लॅब, कॅन्सर तपासणीचे अद्यावत यंत्र साम्रगी


लातूर: रेल्वेचा फिरता दवाखाना अर्थात लाईफ लाईन एक्स्प्रेस लातुरात दाखल झाली आहे. या चाकावरील अद्ययावत रुग्णालयाचा लाभ हजारो रुग्ण घेत आहेत. या रुग्णालयात मिळणार्‍या आरोग सेवेबद्दल रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत.
पुढील वीस दिवस ह्या रेल्वेतून जिल्हातील गरजू नागरिकांना डोळे, कान, कॅन्सर, पोलिओ, कुटुंब नियोजन, ऑर्थोपॅडिक आदी आजारांची मोफत तपासणी करुन आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. याकरिता तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. या एक्सप्रेसमध्ये अद्यावत ऑपरेशन थिएटर, काऊंसलिंग रुम, लॅब, कॅन्सर तपासणीचे अद्यावत यंत्र साम्रगी, डोळे व कान तपासणीची मशिनरी, मेडीकल स्टोअर, ॲडमिट पेशंटसाठींची खोली आदी सुविधा आहेत. या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून १६ ते १९ जून २०१८ या कालावधीत रुग्णांच्या डोळयांची तपासणी केली जाणार आहे. १७ ते २२ जून २०१८ या कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कानांचे विकार असलेल्या रुग्णांची तपासणी २३ ते २६ जून रोजी करुन २४ ते २९ जून या कालावधीत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणेच तोंडाचे कॅन्सरच्या रुग्णांची तपासणी व उपचार १८ ते ३० जून या कालावधीत करुन ०५ जुलै ते ०६ जुलै या कालावधीत रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. स्त्री रोग उपचार (स्तन व गर्भाशय कॅन्सर तपासणी) १८ ते ३० जून या कालावधीत करुन ०५ ते ०६ जुलै रोजी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातील. फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील तपासणी व उपचार ३० जून ते ३१ जुलै तर शस्त्रक्रिया ०१ जुलै ते ०३ जुलै या कालावधीत होतील. त्याप्रमाणेच पोलिओ रुग्णांचे प्रशिक्षण ३० जून ते ०१ जुलै कालावधीत केले जाऊन शस्त्रक्रिया ०१ जूलै ते ०३ जुलै या कालावधीत केल्या जाणार आहेत.


Comments

Top