logo

HOME   व्हिडिओ न्यूज

कोंडेकर म्हणतात देशात अपक्षांचं राज्य आणणार!

कॉंग्रेस असो की भाजपा राष्ट्रीय पक्षांनीच देशाचं वाटोळं केलं

लातूर: निवडणूक म्हटली आणि विजयप्रकाश कोंडेकरांची आठवण झाली नाही असं होत नाही. त्यांनी आजवर किती निवडणुका लढल्या हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल. एवढ्या मोह्या प्रमाणावर निवडणुका लढल्याने त्यांचे नाव गिनिज बुकातही जाऊ शकते. पण ते म्हणतात मला विक्रमासाठी नाही तर देशाच्या कल्याणासाठी निवडणुका लढायच्या आहेत. आमदारकीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी आजवर एकही निवडणूक सोडली नाही. निवडणूक महर्षी अशी पदवीही त्यांना द्यायला हरकत नाही. असो.
आज कोंडेकरांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी सरकार अपक्षांचं असेल त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय पक्षांनीच ७१ वर्षे या देशाचं वाटोळं केलं आहे असा दावा ते करतात. राष्ट्रीय पक्षांचं सरकार येऊ शकतं तर अपक्षांचं का नाही असा प्रश्न ते करतात!


Comments

Top