HOME   व्हिडिओ न्यूज

आयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे बोधीवृक्ष, अनोखा प्रयोग


लातूर: काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज अनोखं वृक्षारोपण घडवून आणलं. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याला वंदन करताना पाय पोळतात, उन लागतं, विशेषत: १४ एप्रिलला लहान थोर, महिला, मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन विश्वज्योत रांजणकर, अमित तिकटे, किरण माने, रवींद्र जगताप, ऋषी होळीकर, किशोर पुलकुर्ते यांनी पुतळ्याच्या मागच्या बाजूस आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पिंपळाचं रोपण केलं. यावेळी मनपाचे उपायुक्त हर्षल गायकवाड, अभियंता काझी, वन विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हारतुरे टाळून विश्वज्योत रांजणकर यांनी आयुक्त, उपायुक्त आणि आजलातूरचे मुख्य प्रतिनिधी ऋषी होळीकर यांना संविधानाच्या प्रती भेट दिल्या.
गौतम बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्विकारली, लाखो बुद्ध उपासक घडवले, बोधीवृक्ष, गौतम बुद्ध आणि बाबासाहेब हे नातं पाहता पिंपळ वृक्षाची निवड करण्यात आली.


Comments

Top