HOME   व्हिडिओ न्यूज

गंजगोलाईत कचर्‍याचं फेस्टीवल, मनपा थकली

हैद्राबादच्या धर्तीवर कचरा रात्रीच साफ करण्याचा आयुक्तांचा मनोदय


लातूर: कचरा व्यवस्थापनाची नवी यंत्रणा मार्गी लागल्यापासून कचरा मोठ्या प्रमाणावार उचलला जात आहे. पण उघड्यावर दिसणार्‍या आणि उघडपणे जाळल्या जाणार्‍या कचर्‍याचेही उग्र रुप दिसत आहे. स्टेडीयम, पोलिस ठाणे आणि चांगल्या चांगल्या वस्त्यातही मन लावून कचरा जाळला जात आहे. काही माध्यमांनी तर अशा बातम्या लोकांसमोर आणणेच बंद केले आहे. काही माध्यमे कसोशिने प्रयत्न करीत आहेत.
लातूरच्या गंजगोलाईला जोडणारे १६ रस्ते आहेत. या प्रत्येक रस्त्यात विशिष्ट बाजारपेठ वसली आहे. जेव्हा सकाळी आठच्या आधी या भागात फिरु तेव्हा प्रत्येक दुकानासमोर कचरा विर्सावलेला असतो. रात्री दुकानदार दुकान बंद करताना कचरा बाहेर टाकतात आणि नंतर शटर लावतात. मनपाची कचरा व्यवस्थापन यंत्रणा हा कचरा जमेल त्या पद्धतीने दिवसभर गोळा करीत राहते. परिणामी सकाळी सकाळी आलेल्या गिर्‍हाईकाला या दुकानात काय काय मिळते हे कचरा पाहून समजून येतं. हा एक मोठा फायदा त्यामुळे होते. पुढे हा कचरा उचलेपर्यंत वार्‍याने कापडलाईनभर फिरत असतो!
याबाबत १५ दिवसांपूर्वी आमची आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. हा मार्केटमधला हा कचरा हैद्राबादपमाणेच रात्री उचलला जावा. जेणेकरुन सकाळी मार्केट स्वच्छ दिसेल असे आम्ही सुचविले, ते आयुक्तांनी मान्यही केले पण अजून अमलात आलेच नाही. कालच आम्ही पोस्टाची पेटी, त्याबाजुला पडलेला कचरा आणि तिथं चरणारी गाढवं असा फोटो गॅलरीत टाकला आहे.


Comments

Top