HOME   व्हिडिओ न्यूज

स्क्रॅप मार्केटच्या विहिरीत सापडला मृतदेह

डालडा फॅक्टरीच्या पडीक जागा मनपाने ताब्यात घ्याव्यात- विक्रांत गोजमगुंडे


लातूर: लातुरच्या डालडा फॅक्टरी आणि स्क्रॅप मार्केटच्या परिसरात असलेल्या जुन्या विहिरीत एक मृतदेह आढळून आला. सकाळी नऊ वाजल्यापासून हा मृतदेह या विहीरीतून काढण्याचा प्रयत्न अग्नीशामक दल करीत होते. दुपारी साधारणत: दोनच्या सुमारास त्याला यश आले. ही विहीर खूप जुनी आणि धोकादायक असून ती बुजवून टाकावी, या भागातील डालडा फॅक्टरीच्या पडीक जागा मनपाने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे. अशा प्रकारचा ठरावही झाल्याचे त्यांनी सांगितले. आज विहीरीत सापडलेला मृतदेह तीन दिवसांपूर्वी विहीरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Comments

Top