HOME   व्हिडिओ न्यूज

मुस्लीम बांधवांनी तहसीसमोर केलं मुंडन

समाजाला आरक्षण, विविध आयोगांची अमलबजावणीसाठी समाज आग्रही


लातूर: मुस्लीम समाजातील अनेक घटक अतिमागास आहेत, स्त्यांना शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने रंगनथ मिश्र आयोग, सच्चर आयोग, महेमुदूर्रमहेमान आयोग यांना मुसलीम समाजाचा अभ्यस करुन शिफारसी सुचविण्यास सांगितले होते होते. तसे झालेही पण सरकारने त्याची कसलीही दखल घेतली नाही. अलीकडेच राज ठाकरे यांनी अजानबद्दल अयोग्य टिपण्णी केली होती याच्या निषेधार्थ लातुरच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाजीदभाई मनियार यांच्या पुढाकाराने मुस्लीम योद्धा संघटनेतर्फे तहसीलसमोर मुंडन आंदोलन केले, आपला निषेध आणि संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाच्या अजानबद्दल अपशब्द वापरुन मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे दोन समाजात तेढही निर्माण होऊ शकते, ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा नोंद करावा अशीही मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्याता आला आहे. यावेळी टिल्लू शेख, इरफान शेख, साधूभाऊ गायकवाड, मोहम्मद गौस, रफीक सय्यद, एमबी सय्यद, जहांगीर शेख, हमीद खान, एम बी पठाण, दिनेश सावळे, मनोज सावळे, अजय सूर्यवंशी, विनय जाकते, रफीक तांबोळी, विपीन शिंदे, कांबळे प्रशांत यांच्यसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top