HOME   लातूर न्यूज

डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS

२०० पेक्षा अधिक रुग्णालयांचा सहभाग, हजारो रुग्णांची तपासणी व उपचार


डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा नवा लातूर पॅटर्न BIG NEWS

लातूर: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त लातूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी आयोजित महाआरोग्य शिबीरात २०० पेक्षा अधिक रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांनी हजारो रुग्णांची तपासणी व उपचार केले. रुग्ण तपासणी व उपचाराच्या माध्यमातून लातूर शहर व जिल्हयातील डॉक्टरांनी लोकनेत्यास आदरांजली अर्पण केली. या उपक्रमाचे जनसामान्यांतून कौतूक होत आहे.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी लोकनेते विलासराव देशमुख यांना शहर व जिल्हयातील जवळपास सर्व रूग्णलयात आंदराजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिीतीत आरोग्य शिबीराची सुरूवात करण्यात आली. या शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक सोयीसुविध व उपकरणाच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी करून रोग निदान केले. यानंतर रूग्णावर उपचारही करण्यात आले. या शिबीरातील अनेक रुग्णालयात मोफत व काही ठिकाणी माफक दरात औषधी देण्यत आली.
रात्री उशीरा पर्यत रूग्णसेवा
महाआरोग्य शिबीरात लातूर व जिल्हयात रात्री उशीरा पर्यंत रूग्णाच्या तपासण्या, रोगनिदान व उपचार होते. सोशल मिडीयातून महाआरोग्य शिबीराची माहिती जस जशी रूग्ण व नातेवाईकापर्यत पोहचत होती तसतसे रुग्ण शिबीराच्या ठिाकाणी येत होते. यामुळे निश्चीत किती रूग्णाची तपासणी झाली, किती रूग्णांचे रोगनिदान झाले व किती जणांनी उपचार घेतला यांची निश्चित माहिती रात्री उशीरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.
शिबीरात दुर्धर आजारावर उपचार
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनी आयोजीत महाआरोग्य शिबीरात लातूर शहर व जिल्ह्यातील रुग्णाल्यांच्या वतीने कॅन्सर, स्क्रिनिंग, कन्सल्टंन्सी, मेंदूरोग तपासणी, अँजिओग्राफी, इंडोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, किडनी रोग, बालरोग तपासणी, अस्थीरोग तपासणी, होमिओपॅथिक आणि ओबिजीवाय तपासणी, त्वचा आणि सौंदर्य समस्या तपाणी, हेअर विकार तपासणी, लहान मुलांचे मेंदू विकास तपासणी, मूळव्याध तपासणी, पचन विकार तपासणी, एनो-रेक्टल तपासणी, डोळयांची तपासणी, छातीचे रोग तपासणी व निदान, कान, नाक, घसा, दंत विकार तपासणी व उपचार करण्यात आले. शिबीरात दुर्धर आजारावरावरही उपचार करण्यात आले. यासोबतच अनेक रुग्णाल्यांच्या वतीने रुग्णांना मोफत व माफक दरात औषधी देण्यात आली.
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत महाआरोग्य शिबीराच्या व्यवस्थापनात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमेश भराटे, सचिव डॉ. जितेन जैस्वाल, निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोराळे, आ.डी.आय. असोसिएशनचे डॉ. नितीन शितोळे, डॉ. सतिष बिराजदार, होमिओपॅथी असोसिएशनचे संजय गव्हाणे, डॉ. पुरूषोत्तम दरक, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. पवन लड्डा, यासह सर्व डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व विलासराव देशमुख फाऊंडेशन यांनी रात्री उशिरापर्यंत महाआरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Comments

Top