HOME   लातूर न्यूज

मनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती

न्यायालयाच्या निर्णयाची सर्वांनाच प्रतिक्षा, १८ ला नव्या निवडी


मनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती

लातूर: लातूर शहर महापलिकेची सभापती निवडीवरुन वदग्रस्त ठरलेल्या स्थायी समितीच्या सद्स्य निवृतीची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडली. या बैठकीत सत्ताधारी भाजपासह विरोधकांचे प्रत्येकी चार सदस्य चिठ्ठया काढुन निवृत्त झाले. या रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागी येत्या १८ सप्टेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये नव्या सदस्यांची निवड करण्यात य़ेणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कॉंग्रेसच्या सदस्यांनी नेला होता. या प्रकरणात न्यायालयाने सर्वसाधारण सभेत झालेली सभपतीची निवड पक्रिया रद्दबातल ठरवून स्थायी समितिचे सदस्य निवडीची सभा पूर्वीचे सभापती अशोक गोविंद्पूरकर यांच्या अध्यक्षतेखाली १४ सेप्टेंबर रोजी घ्यावी व त्यामध्ये ८ सदस्य चिठ्ठया काढून निवृत्त करावेत, असे आदेश दिले होते. त्यानुसार सभापती अशोक गोविंद्पूरकर यांनी शुक्रवारी सकाळी ११ स्थायी समितिची सभा घेतली. या सभेत ८ सदस्याच्यां निवृत्तीचा विषय मांडण्यात आल्यानंतर भाजपाचे सदस्य अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे व शैलेश स्वामी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील काही बाबींवर प्रकाश टाकत ही सभा नियमानुसार होत नसल्याचा आक्षेप घेतला. शेवटी सभापती अशोक गोविंद्पूरकर यांनी निवड प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे सांगुन दोन शाळकरी मुलांच्या हाताने १६ सदस्यापैकी ८ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठया काढल्या त्यामध्ये भाजपाचे अ‍ॅड. शैलेश गोजगुंडे, शैलेश स्वामी, शीतल मालू व संजय रंदाळे, तर कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे, अहमदखान पठाण, बाळासाहेब देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजा मणियार यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांच्या रिक्त जागांवर येत्या १८ सेप्टेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची निवड होणार आहे.


Comments

Top